पाकच्या सिंध प्रांतात हिंदु तरुणाला मारहाण आणि हिंदु व्यापार्यांवर गोळीबार : ३ जण घायाळ
पाकमधील असुरक्षित हिंदू आणि निष्क्रीय मानवाधिकार आयोग अन् भारत !
कराची (पाकिस्तान) – पाकमधील मानवाधिकार कार्यकर्ते राहत ऑस्टिन यांनी पाकच्या सिंध प्रांतातील उमरकोटमधील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून पोस्ट केला आहे. यात धर्मांधांचा जमाव हिंदु तरुणाला अमानुष मारहाण करत असल्याचे दिसत आहे. त्याच्या केसांना धरून त्याला मारहाण केली जात आहे.
Pakistani Human Rights activist Rahat Austin shared a disturbing video from Umarkot in Sindh wherein a Hindu boy was being brutally assaulted by an angry Muslim mobhttps://t.co/UEgyF3qHYZ
— OpIndia.com (@OpIndia_com) December 19, 2020
राहत ऑस्टिन यांनी आणखी एक व्हिडिओ पोस्ट करून त्यावर ट्वीट केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, हिंदु मुलाला मारहाण करण्याच्या या घटनेच्या एक दिवस आधी येथील आयशा बाजारात हिंदूंच्या दुकानांवरही आक्रमण करण्यात आले. यात राजा मल्ही, आनंद आणि अशोक माली या ३ हिंदु व्यापार्यांना गोळ्या लागल्या आणि ते घायाळ झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले. येथे हिंदूची स्थिती दयनीय आहे. मुसलमानांना वाटते की, हिंदूंनी त्यांची संपत्ती सोडून या शहरातून दुसरीकडे निघून जावे.
पाकमध्ये अनेक जण मुसलमानेतरांची संपत्ती खैरातीचा माल समजतात. त्यामुळे ते मुसलमानेतराची संपत्ती सातत्याने हडपण्याचा प्रयत्न करत असतात.