सत्ताधारी माकपच्या कार्यकर्त्यांकडून मंदिरात तोडफोड, देवतांच्या मूर्तींचा अवमान आणि चोरी
माकपच्या ११ कार्यकर्त्यांना अटक
|
पलक्कड (केरळ) – येथील सुब्रह्मण्यम् मंदिरात तोडफोड केल्याच्या प्रकरणी सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ११ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.
Kerala: 11 CPI(M) workers arrested over temple vandalism in Palakkad https://t.co/yzb8dnYBIA
— Republic (@republic) December 18, 2020
(वरील छायाचित्रे आणि व्हिडीओ प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. – संपादक)
नुकत्याच राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी माकपला मोठे यश मिळाल्यावर माकपच्या कार्यकर्त्यांकडून भाजप आणि रा.स्व. संघ यांच्या कार्यालयांवर आक्रमणे करण्यात आली, तसेच पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. त्याच वेळी त्यांनी सुब्रह्मण्यम् मंदिरावरही आक्रमण केले. देवतांच्या मूर्तींचा अवमान केला. मंदिरातील पैसे आणि सोन्याचे दागिने यांची लूट केली. तेथील दिवे तोडले.