‘टीआरपी’ घोटाळ्याप्रकरणी पोलिसांची ‘बार्क’च्या कार्यालयात धडक
मुंबई – पैसे देऊन कृत्रिमरित्या ‘टीआरपी’ वाढवल्याच्या प्रकरणी पोलिसांनी १८ डिसेंबर या दिवशी भारत ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (बार्क) च्या कार्यालयावर धाड टाकली.
‘टीआरपी’ घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी १७ डिसेंबर या दिवशी भारत ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे माजी अधिकारी रोमिल रामगडिया यांना अटक केली आहे. मागील ४ वर्षांपासून रोमिल पैसे घेऊन ‘रिपब्लिक टी.व्ही.’ला तांत्रिक माहिती पुरवत होता. यावरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
रिपब्लिक टी.व्ही.चे आर्थिक चढउतार पडताळण्यासाठी पोलिसांनी ‘फॉरेन्सिक ऑडिट’चा अहवाल मागितला होता. हा अहवाल पोलिसांना उपलब्ध झाला असून पुढील कारवाईसाठी तो अंमलबजावणी संचालनालयाकडे पाठवण्यात आला आहे.