डोंबिवली औद्योगिक वसाहतीतील शक्ती प्रोसेस आस्थापनाला भीषण आग
ठाणे – डोंबिवली औद्योगिक वसाहत परिसरातील खंबालपाडा भागात असलेल्या शक्ती प्रोसेस या आस्थापनाला १८ डिसेंबर या दिवशी सायंकाळी भीषण आग लागली. शुक्रवार असल्यामुळे आस्थापनाला सुट्टी होती; मात्र तेथे देखभाल दुरुस्तीचे काम चालू होते. आस्थापनात कपड्यावर प्रक्रिया करण्याचे काम होते. त्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले; मात्र या पूर्वीच सर्व कामगार बाहेर आल्याने जीवितहानी टळली. आगीमुळे आस्थापनाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. कल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगर महानगरपालिका आणि औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.