संस्कृतला राष्ट्रीय भाषा घोषित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

अशी याचिका का प्रविष्ट करावी लागते ? काँग्रेसने संस्कृतला मृत ठरवले, त्या भाषेला आताच्या सरकारने पुनरुज्जीवित करून त्याला गतवैभव मिळवून देणे संस्कृतप्रेमींना अपेक्षित आहे !

नवी देहली – संस्कृत भाषेला राष्ट्रीय भाषा आणि हिंदीला तिची अधिकृत भाषा घोषित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे. गुजरातचे माजी अतिरिक्त सचिव के.जी. वंजारा यांनी ही याचिका प्रविष्ट केली आहे. सध्या ते गुजरात उच्च न्यायालयात वकिली करत आहेत. भारतात सध्या २२ भाषा आहेत; मात्र कोणत्याही भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा देण्यात आलेला नाही.

या याचिकेत म्हटले आहे की,

भारताने इस्रायलकडून शिकले पाहिजे. त्याने वर्ष १९४८ मध्ये हिब्रू (इब्रानी) भाषेला इंग्रजीसहित अधिकृत राष्ट्रीय भाषा घोषित केली. हिंब्रू गेली २ सहस्र वर्षे ज्यूंची मृतभाषा म्हणून गणली जात होती. संस्कृतला राष्ट्रीय भाषा घोषित केल्यास त्याला कोणताही धर्म किंवा जाती यांकडून विरोध होणार नाही. संस्कृतमुळे मुलांचा बौद्धिक विकास होतो.