पाकपेक्षा भारतात मुसलमान अधिक असल्याने त्यांना देण्यात आलेला अल्पसंख्यांक दर्जा रहित करा ! – खासदार साक्षी महाराजांची मागणी
केंद्रात साक्षी महारज यांचाच पक्ष सत्तेत असल्याने त्यांनी ही मागणी मार्गी लावण्यासाठी सरकारचा पाठपुरावा घ्यावा, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
बागपत (उत्तरप्रदेश) – देशात सध्या पाकपेक्षाही अधिक मुसलमान आहेत. पाकची एकूण लोकसंख्या २२ कोटी आहे, तर भारतात केवळ मुसलमानांचीच लोकसंख्या २० कोटी आहे,जो चिंतेचा विषय आहे. त्यामुळे भारतातील मुसलमानांना देण्यात आलेला अल्पसंख्यांकांचा दर्जा त्वरित रहित केला पाहिजे, अशी मागणी भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केली. ते येथे एका कार्यक्रमात बोलत होते.