गोवा मुक्तीच्या षष्ठ्यब्दीनिमित्त आज सोहळा
पणजी, १८ डिसेंबर (वार्ता.) – गोवा मुक्तीच्या षष्ठ्यब्दीनिमित्त एक महासोहळा असणार आहे, असे शासनाने घोषित केले आहे. या महासोहळ्याच्या वर्षभराच्या कार्यक्रमांना १९ डिसेंबर २०२० पासून प्रारंभ होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सन्माननीय उपस्थितीत या सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. या समारोहासाठी गोवा राज्य सज्ज झाले आहे.
President @rashtrapatibhvn will visit Goa (Panaji) on December 19 and 20, 2020, to grace the commencement of the 60th Goa’s Liberation Day celebrations on December 19, 2020.@PIB_India
— DD India (@DDIndialive) December 18, 2020
गोवा मुक्तीदिनाच्या निमित्ताने परंपरागत ध्वजारोहण कार्यक्रम सकाळी कांपाल मैदानात होणार आहे. या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.