५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला मडगाव (गोवा) येथील कु. अद्वैत कदम (वय ९ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. अद्वैत कदम हा एक आहे !
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेाची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
मार्गशीर्ष शुक्ल पक्ष षष्ठी (चंपाषष्ठी) २०.१२.२०२० या दिवशी कु. अद्वैत कदम याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला लक्षात आलेली त्याची काही गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. अद्वैत कदम याला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. जन्मापूर्वी
१ अ. ‘मला गर्भारपणी पूर्ण ९ मास सत्सेवा करता आली. मला सेवा करतांना कधीही कोणताच त्रास जाणवला नाही.
२. जन्मानंतर
२ अ. जन्म ते ३ वर्षे
२ अ १. शुभमुहूर्तावर जन्म होणे : अद्वैतचा जन्म मार्गशीर्ष मासातील चंपाषष्ठीला (३०.११.२०११ बुधवार दुपारी १२.३८ वाजता) झाला. स्थुलातून कोणतेही नियोजन न करता अद्वैतचा जन्म गुरुकृपेने शुभमुहूर्तावर झाला.
२ अ २. आनंदी आणि हसतमुख : त्याच्याकडे पाहून नेहमीच आनंद वाटतो आणि समाधान मिळते. सर्व जण त्याच्याकडे आकर्षिले जातात. सर्वांना त्याचा सहवास हवाहवासा वाटत असे.
२ अ ३. शांत आणि समजूतदार : अद्वैत लहान असल्याने मला समष्टी साधना अधिक प्रमाणात करता येत नव्हती. तेव्हा मी परात्पर गुरुदेवांना प्रतिदिन ‘मला आपल्या चरणसेवेत रुजू करून घ्या’, अशी प्रार्थना करत होते आणि खरोखरच गुरुदेवांच्या अपार प्रीतीमुळे मला साप्ताहिक सत्संग घेण्याची सेवा मिळाली. तेव्हा ‘सत्संगात अद्वैत शांत बसेल का ? मला सत्संग घेता येईल का ?’, असा प्रश्न मला पडला होता; पण अद्वैतने मला सत्संगात कधीच अडथळा आणला नाही. तो त्याच्या मित्रासह खेळायचा. अद्वैत शांत आणि समजूतदार असल्याने तो लहान असूनही अन्य मुलांप्रमाणे ‘हट्ट करणे, त्रास देणे’, असे करत नव्हता.
२ अ ४. गुरुदेवांचा प्रसाद मिळणे : तो २ वर्षांचा असतांना परात्पर गुरुदेवांच्या कृपेने आम्हाला रामनाथी आश्रमात जायला मिळाले. त्याला गुरुदेवांचा प्रसाद मिळाला. तेव्हा आमची गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
२ आ. वय ३ ते ८ वर्षे
२ आ १. नम्र : तो सर्वांशी नम्रतेने वागतो. तो इतरांच्या वस्तूंना त्यांना विचारल्याविना हात लावत नाही. तो इतरांना उलट उत्तरे देत नाही. तो प्रत्येक गोष्ट मला विचारून करतो. तो मला प्रत्येक वेळी ‘खेळायला जाऊ का ? ही वस्तू घेऊ का ? बाहेर जाऊ का ?’, असे विचारतो.
२ आ २. ऐकण्याची वृत्ती : मी सत्संगाला बसने जायचे. तेव्हा तो कसलीच तक्रार न करता बसस्थानकापर्यंत चालत यायचा. तो सत्संग संपेपर्यंत (काही वेळा ४ घंटे) शांत बसून सत्संगात अभ्यास करायचा.
२ आ ३. प्रेमभाव
अ. ‘घरी साधक आणि पाहुणे यांनी प्रतिदिन यावे’, असे अद्वैतला वाटते. अद्वैतला त्यांचे आदरातिथ्य करायला आवडते.
आ. त्याला शाळेत काही खाऊ मिळाल्यास तो खाऊ शाळेत न खाता आमच्यासाठी आणतो.
इ. त्याला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथातील परात्पर गुरु डॉक्टरांची छायाचित्रे पहायला पुष्कळ आवडते.
२ आ ४. इतरांचा विचार करणे : आमच्या शेजारी रहाणार्या व्यक्तींना एखादी गोष्ट हवी असल्यास अद्वैत ती वस्तू त्यांना लगेचच आणि मनापासून देतो. अद्वैत त्याच्या आवडत्या वस्तू आणि खाऊ त्याचे भाऊ-बहीण अन् मित्र-मैत्रिण यांना स्वतःहूनच देतो. त्याने इतरांना खाऊ दिल्यावर काही वेळा त्याला खाऊ शेष रहात नाही, तरीही तो आनंदी आणि समाधानी असतो.
२ आ ५. सेवेची आवड : अद्वैतला ग्रंथप्रदर्शनाच्या वेळी साहित्य वितरणाची सेवा करायला पुष्कळ आवडते. ‘समाजातील सर्वच लोकांनी प्रदर्शन पहायला यायला हवे’, असे त्याला वाटते. अद्वैत काही वेळा साधकांना भ्रमणभाष करून निरोप देतो. तो घरातील लहान सेवा, उदा. कपड्यांच्या घड्या घालणे, पुस्तके आणि वर्तमानपत्रे व्यवस्थित ठेवणे, पलंगावरील चादर स्वच्छ करणे, केर काढणे आणि देवपूजा करणे इत्यादी सेवा करतो.
२ आ ६. साधनेची आवड : तो वास्तूशुद्धी करतो. तो घरात गोमूत्र शिंपडतो. तो शुभंकरोती म्हणतो आणि नामजप लिहितो. तो ध्यानाच्या वेळेत नामजप करतो. तो दिवसभरात मधूनमधून प्रार्थना करतो.
२ आ ७. इतरांना आनंद देणे : अद्वैत ४ वर्षांचा असताना मी रामनाथी आश्रमात अधिवेशनाच्या सेवेसाठी गेले होते. तेव्हा काही साधकांनी ‘याच्याकडे पाहून आनंद वाटतो’, असे सांगितले.
३. स्वभावदोष
अव्यवस्थितपणा, उतावळेपणा, राग येणे आणि एकाग्रतेचा अभाव
४. क्षमायाचना
‘हे गुरुमाऊली, मी आपली अपराधी आहे. अद्वैतविषयीची सूत्रे मी आता (त्याच्या आठव्या वर्षी) लिहून देत आहे. त्यासाठी बर्याच साधकांनी माझा पाठपुरावा घेतला. माझ्यातील स्वभावदोषांमुळे मी त्याच्याविषयी वेळेत लिहून दिले नाही. त्याविषयी मी क्षमा मागते.’
५. कृतज्ञता
‘हे गुरुदेव, तुमच्या कृपेमुळे माझ्या पोटी अद्वैतसारखा समंजस आणि प्रेमळ मुलगा जन्माला आला. अद्वैतमधील समंजसपणामुळे मला सेवेमध्ये कधीही अडचणी आल्या नाहीत. खरे तर अद्वैत बर्याच गोष्टीत मला समजून साहाय्य करतो; म्हणून मी त्याला सांभाळून साधना करू शकते. ही केवळ आपली प्रीती आणि कृपा आहे. आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. सारिका कदम (आई), मडगाव, गोवा. (८.९.२०२०)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |