छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवून धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र निर्माण करण्याची आवश्यकता ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती
धुळे येथील युवा धर्मप्रेमींसाठी ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्यान
धुळे – आज साधू, संत, हिंदुत्वनिष्ठ यांच्यावर आक्रमणे होत आहेत. देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवून धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची वेळ आता आली आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. हर्षद खानविलकर यांनी केले. युवकांमधील शौर्य जागृत करणे, स्वरक्षण प्रशिक्षण शिकण्याचे महत्त्व विशद करणे यांसाठी धुळे शहरातील युवा धर्मप्रेमींसाठी १३ डिसेंबर २०२० या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अमोल वानखडे यांनी केले.
क्षणचित्रे
१. व्याख्यानाला उपस्थित सर्व धर्मप्रेमींनी विषय ऐकून ‘चॅट बॉक्स’मध्ये चांगला प्रतिसाद दिला.
२. व्याख्यानात मांडलेल्या विषयामुळे जागृत झालेल्या धर्मप्रेमींनी शौर्यजागृती सप्ताह चालू करण्याची मागणी केली.