श्रीलंकेपासून शिका, तर चीनपासून सावध रहा ! – भारताची नेपाळला चेतावणी  

नेपाळनेच नाही, तर भारतानेही सावध रहाण्याची आवश्यकता आहे ! तसे न राहिल्यानेच चीनने पेंगाँग तलावाजवळील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घुसखोरी केली आहे, ही वस्तूस्थिती आहे !

नवी देहली – भारताची सद्भावना कोणत्याही धाग्याने जोडलेली नाही. नेपाळ आंतरराष्ट्रीय प्रकरणांमध्ये स्वतंत्ररित्या कार्य करू शकतो. तसेच नेपाळला श्रीलंका आणि आशियातील अन्य देशांकडून शिकले पाहिजे आणि चीनपासून सावध राहिले पाहिजे, अशी चेतावणी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सी.डी.एस्.) जनरल बिपिन रावत दिली. ते एका कार्यक्रमात बोलत होते.