देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी विधानसभेत फाडली कृषी कायद्याची प्रत !
मुख्यमंत्रीपदावर असतांना भर विधानसभेत अशोभनीय आणि लोकशाहीविरोधी कृत्य करणारे केजरीवाल ! लोकशाहीमध्ये अशा प्रकारचे वर्तन सुशिक्षित आणि सभ्य व्यक्ती कधीही करणार नाही, हे केजरीवाल यांना ठाऊक नाही का ?
नवी देहली – शेतकर्यांच्या आंदोलनात आतापर्यंत २० हून अधिक शेतकरी हुतात्मा झाले आहेत. आपल्या देशातील शेतकरी हा भगत सिंह यांच्याप्रमाणे कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहे. (कुणाला कोणती उपमा द्यायची हेही ठाऊक नसलेले केजरीवाल ! – संपादक) त्यामुळे मोदी सरकारने आता इंग्रजांपेक्षाही अधिक वाईटपणा करू नये, अशी फुकाची टीका करत देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्राच्या कृषी कायद्याची प्रत भर विधानसभेत फाडली.
Kejriwal tears copies of Centre’s farm laws, says cannot ‘betray’ farmers https://t.co/CGEYhMXsYo
— TOI Top Stories (@TOITopStories) December 17, 2020
‘कोरोना काळात घाईघाईने हे ३ कायदे संमत करून घेण्याची काय आवश्यकता होती ? शेतकर्यांसाठी आणलेले हे कायदे काळे कायदे आहेत. आम्ही त्यांचा धिक्कार करतो. देहली राज्यात हे कायदे लागू होणार नाहीत’, असेही केजरीवाल यांनी या वेळी घोषित केले.