कोल्हापूर डीस्ट्रिक्ट माऊंटेनिअरिंग असोसिएशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय पर्वतदिन साजरा !
कोल्हापूर – कोल्हापूर डीस्ट्रिक्ट माऊंटेनिअरिंग असोसिएशन आणि त्यांच्याशी संलग्न ७४ संस्थांच्या वतीने आंतरराष्ट्रीय पर्वतदिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील अनेक डोंगर शिखरांवर आरोहण आणि पर्वत पूजन आयोजित करण्यात आले होते. यातील मुख्य कार्यक्रम वाघजाई डोंगर शिखर आरोहण आणि वाघजाई डोंगर पूजन असा घेण्यात आला. जिल्ह्यातील बहुसंख्य संस्था आणि प्रतिनिधी यांनी कोरोना संसर्गाचे सर्व आरोग्य नियम पाळून येथे, तसेच त्यांच्या परिसरातील डोगरांचे पूजन अन् वृक्षारोपण केले.