सिंधमध्ये धर्मांधांकडून हिंदूंच्या घरांवर आक्रमण
पाकमधील असुरक्षित आणि असाहाय्य हिंदू ! त्यांच्याविषयी कुठलाही मानवाधिकार आयोग आवाज उठवत नाही आणि भारतातील हिंदूही मौन बाळगतात !
नवी देहली – पाकमधील मानवाधिकार कार्यकर्ते राहत ऑस्टिन यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून पाकच्या सिंधमध्ये हिंदूंच्या घरावर धर्मांधांनी आक्रमण आणि लुटमार केल्याची माहिती दिली.
Persecution of religious minorities continue in Pakistan as Islamists attack homes of Hindus in Sindh, forcing them to leave https://t.co/dBtEV7GzN1
— OpIndia.com (@OpIndia_com) December 15, 2020
Muslim neighborhood lead by Muhammad Aslam, attacked homes of Hindu Bheel community, tortured, looted and forced them to leave their properties in Pungaryo, Badin, Sindh-Pakistan.They are so scared to go back & submitted request for protection to Session Judge & SSP police Badin. pic.twitter.com/lmP64atraQ
— Rahat Austin (@johnaustin47) December 15, 2020
ऑस्टिन यांनी सांगितले की, महंमद अस्लम नावाच्या व्यक्तीने त्याच्या शेजारी रहाणार्या लोकांना एकत्र करत तेथील गरीब हिंदूंवर अत्याचार करत त्यांना घर सोडून जाण्यास बाध्य केले. हे हिंदू घाबरलेले आहेत. त्यांनी याविषयी सत्र न्यायालय आणि पोलीस यांच्याकडे संरक्षण देण्याची मागणी केली आहे. या व्हिडिओमध्ये हिंदू त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांच्या विरोधात घोषणाबाजी करतांना दिसत आहेत.