मालेगाव आणि संभाजीनगर येथे चोरी करणार्या बुरखाधारी महिलांच्या ३ टोळ्या जेरबंद
गुन्हेगारीत पुरुषांसमवेत आघाडीवर असणार्या धर्मांध महिला !
पुणे – नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि संभाजीनगर येथून पुणे शहरात येऊन येथील नामांकित बाजारपेठेमधील उच्चभ्रू दुकानांमधून महागड्या साड्या, कपडे, सोन्याचे दागिने चोरणार्या बुरखाधारी महिलांच्या ३ टोळ्या लष्कर आणि मुंढवा पोलिसांनी जेरबंद केल्या आहेत. तीन प्रकरणांत एकूण ९ आरोपींना अटक करत पोलिसांनी २ लाख १९ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शबाना जमीर कुरेशी, शबाना सादिक कुरेशी, एरफना इस्माइल शेख यांच्यासह अन्य ६ जणांना अटक करण्यात आली आहे.
मालेगाव प्रकरणातील या महिला भाड्याने चारचाकी करून पुण्यात खरेदीच्या निमित्ताने आल्या होत्या, तसेच बुरख्याच्या आत चोरीच्या वस्तू लपवून पसार होत होत्या. सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांची चोरी कैद झाल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.