सरपंचपदाची आरक्षण सोडत पुढे ढकलली
सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – जिल्ह्यातील सरपंचपदासाठीची आरक्षण सोडत १६ डिसेंबर या दिवशी तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी आयोजित केली होती. ही आरक्षण सोडत स्थगित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत कालावधी संपत असलेल्या ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे सरपंचपदाची आरक्षण सोडत १५ जानेवारी २०२१ नंतर घेण्यात येणार आहे, अशी माहिती माहिती उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.