‘सरकारीकरण झालेल्या मंदिरातील कर्मचार्याच्या पाया पडायला लाज वाटेल’, असे प.पू. स्वामी वरदानंद भारती यांनी सांगणे
संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक आणि विद्वान प.पू. स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे प्राचार्य अनंतराव आठवले) मंदिर सरकारीकरणाविषयी म्हणाले होते, ‘‘कोणत्याही मंदिरात दर्शनासाठी तेथील पुजार्याच्या पाया पडायला आम्हाला कमीपणा वाटत नाही; कारण त्याच्या मागे परंपरेचा आधार आहे; पण उद्या मंदिर सरकारच्या कह्यात गेल्यावर त्या शासकीय कर्मचार्यांच्या पाया पडायला आम्हाला लाज वाटेल.’’
– कै. भागवताचार्य वा.ना. उत्पात, पंढरपूर, सोलापूर (संदर्भ : मासिक ‘सांस्कृतिक वार्तापत्र’, १५ ऑगस्ट २००७)