जुन्नर येथे धर्मांधांकडून मंदिराच्या समोर एकमेकांना अंडी मारून वाढदिवस साजरा
यातून मंदिराचे पावित्र्य भंग करण्याची धर्मांधांची विखारी मानसिकता लक्षात येते !
जुन्नर – जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे मुक्ताई मंदिरासमोर १३ डिसेंबरला रात्री साडे ९ वाजता एकमेकांवर अंडी मारून वाढदिवस साजरा करणार्या ६ धर्मांधांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
नारायणगाव येथील मुस्लिम मोहल्ला परिसरात रहाणार्या सकलेन नासिर आतार याचा वाढदिवस होता. तो साजरा करण्यासाठी नारायणगावचे ग्रामदैवत मुक्ताई मंदिरासमोर त्याचे मित्र जमले. त्यांनी तेथेच त्याच्यावर अंडी फेकली आणि आरडाओरड करत बीभत्स वर्तणूक केली. अशा प्रकारे विचित्र पद्धतीने वाढदिवस साजरा केल्याने त्याचा निषेध करत या घटनेचा व्हिडिओ नारायणगाव येथील बजरंग दलाचे कृष्णा माने, तसेच काही सामाजिक कार्यकर्ते यांनी सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला. नारायणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी दत्तात्रय गुंड यांनी तातडीने सकलेनसह त्याच्या ५ मित्रांना कह्यात घेत त्यांच्यावर गुन्हा नोंदवला.