बाजीप्रभु आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांच्या समाधीवरील छताचा लोकार्पण सोहळा पार पडला !
कोल्हापूर, १६ डिसेंबर (वार्ता.) – विशाळगड येथे ३६० वर्षांपासून ऊन, वारा, पाऊस सहन करत उघड्यावर असलेल्या वीररत्न बाजीप्रभु आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांच्या समाधीवर सह्याद्री प्रतिष्ठानच्या कोल्हापूर विभागाच्या वतीने छत उभारण्यात आले आहे. याचा लोकार्पण सोहळा १३ डिसेंबर या दिवशी पार पडला.