पू. अशोक पात्रीकर यांनी प.पू. भक्तराज महाराज विरचित भजन गाण्यापूर्वी आणि गायल्यावर साधिकेला झालेले त्रास
१. पहिले भजन
‘संतांनी भजन गाण्याचा तीव्र त्रास असणार्या साधकांवर काय परिणाम होतो’, याविषयी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने संशोधन करण्यात आले. त्या अंतर्गत प.पू. भक्तराज महाराज यांनी रचलेले ‘मजला वेडा म्हणू नका, मजला पागल म्हणू नका । ’, हे भजन पू. अशोक पात्रीकर यांनी गायले. त्या वेळी मला झालेले त्रास येथे देत आहे.
अ. पू. पात्रीकरकाका भजन म्हणत असतांना माझा त्रास पुष्कळ वाढल्याने मी त्रास असलेल्या अन्य साधकांसह बडबड करणे इत्यादी कृतींत सहभाग घेतला.
आ. एवढे करूनही त्रासाचा जोर न्यून होत नसल्याने तिला ‘अजून काहीतरी करावे’, असे वाटत होते; पण पू. पात्रीकरकाका म्हणत असलेल्या भजनांमधून चैतन्य प्रक्षेपित होत असल्याने ‘काय करावे’, हे सुचत नव्हते.’
२. दुसरे भजन
दुसर्या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांनी रचलेले ‘एक तुझे नाम शास्त्रांचा आधार’, हे भजन पू. अशोक पात्रीकर यांनी गायले. त्या संशोधनादरम्यान मला झालेले त्रास येथे देत आहे.
२ अ. गायनापूर्वी
१. सकाळी उठल्यावर माझ्यावर त्रासदायक शक्तीचे पुष्कळ आवरण आल्याने एक क्षण मला ‘अंथरूण कुठे ठेवायचे आहे’, याचा विसर पडला.
२. डोके थोडे जरी हलले, तरी मला चक्कर येत होती.
२ आ. गायन चालू असतांना वेळी : पू. पात्रीकरकाका भजन म्हणत असतांना मला शेवटपर्यंत गाढ झोप लागली. यावरून ‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांमध्ये असलेल्या सामर्थ्याची प्रचीती आली.’
२ इ. गायनानंतर : गायनाच्या संशोधनापूर्वी येत असलेली चक्कर प्रयोगानंतर पूर्णपणे थांबली.’
– कु. तृप्ती कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |