एअर इंडियाच्या विमानांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के दरात तिकीट उपलब्ध होणार !
नवी देहली – देशातील कोणत्याही ६० वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकाला आता एअर इंडिया आस्थापनाच्या विमानाचे तिकीट निम्म्या दरात मिळणार आहे. एअर इंडियाच्या संकेतस्थळावर याची माहिती देण्यात आलेली आहे; मात्र यासाठी काही अटी असणार आहेत. यात ज्येष्ठ नागरिकांकडे भारतीय नागरिकत्व असायला हवे, तसेच त्यांना प्रवासाच्या ७ दिवस आधी आरक्षण करावे लागेल.