दारूबंदी असून बिहारमधील पुरुष दारू पिण्यात देशात पुढे !
दारूबंदी असतांनाही तेथील पुरुषांना दारू मिळतेच कशी ? अशा प्रकारे दारू पिण्यात बिहार पुढे असणे, हे तेथील शासनकर्ते, प्रशासन आणि पोलीस यांना लज्जास्पदच होय !
नवी देहली – बिहार राज्यात दारूबंदी असतांना तेथील पुरुष दारू पिण्यात देशात सर्वांत पुढे आहेत, अशी माहिती राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण २०१९-२० च्या अहवाल देण्यात आली आहे. तसेच दारूबंदी असणार्या गुजरात आणि जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये पुरुष मात्र सर्वांत अल्प दारू पितात, असेही या अहवालात म्हटले आहे. महाराष्ट्राचे पुरुष दारू पिण्यात देशात तिसर्या स्थानी आहेत.
In ‘dry state’ Bihar, men consume more alcohol than in Maharashtra: Surveyhttps://t.co/sWOWhOycWz
— Business Today (@BT_India) December 16, 2020
ईशान्य भारतातील महिला सर्वाधिक दारू पितात !
ईशान्य भारतातील सिक्कीम राज्यातील महिला देशात सर्वाधिक दारू पितात. येथील १६.२ टक्के महिला दारू पितात, तर आसामच्या ७.३ टक्के महिला दारू पितात. गोवा आणि तेलंगाणा वगळले, तर देशात सर्वाधिक दारूचे सेवन ईशान्येकडील महिला करतात.
दारूपेक्षा तंबाखूचे सेवन अधिक
देशात दारूच्या तुलनेत तंबाखूचे सेवन सर्वाधिक केले जाते. मिझोराम राज्यात ७७.८ टक्के पुरुष तंबाखू खातात, तर ६५ टक्के महिलांमध्येही याचे व्यसन आहे. सर्वांत अल्प प्रमाणात तंबाखू सेवन केरळमध्ये केले जाते. येथे १७ टक्के लोक तंबाखू खातात. गोव्यात पुरुषांमध्ये हे प्रमाण १८ टक्के आहे. हिमाचल प्रदेशात सर्वांत अल्प, म्हणजेच १.७ टक्के महिला तंबाखूचे सेवन करतात.