हिंदु धर्म अणि मंदिरे यांच्या रक्षणार्थ विदर्भस्तरीय मंदिर विश्वस्तांची ऑनलाईन बैठक
मंदिर रक्षणार्थ संघटित होण्यासाठी मंदिर विश्वस्त सहमत
यवतमाळ, १६ डिसेंबर (वार्ता.) – मंदिरे हे चैतन्याचे स्रोत आहेत, तसेच हिंदु धर्माची आधारशिला आहेत. मंदिरातून हिंदूंना धर्माचरण करण्याची दिशा मिळते; पण सध्या मंदिरांतील पैशांवर शासनाचा डोळा आहे. मंदिरांचे सरकारीकरण करून त्यातील संपत्ती शासन जमा करत आहे. मशीद आणि चर्च यांमध्ये मात्र शासन हस्तक्षेप करत नाही. हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण व्हावे, मंदिरे भक्तांकडे सुरक्षित रहावीत, यांसाठी ११ डिसेंबर या दिवशी विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांतील मंदिर विश्वस्तांची ‘ऑनलाईन’ बैठक पार पडली. यामध्ये हिंदूंच्या प्रत्येक मंदिरामध्ये सात्त्विक वेशभूषेची आचारसंहिता असावी, मंदिरांमधून देवतांची माहिती असलेले धर्मशिक्षण फलक लावण्यात यावेत, मंदिर रक्षणासाठी सर्व धर्मबंधूंनी संघटित व्हावे, यासाठी सर्वांनी सहमती दर्शवली.
या बैठकीला हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्य संघटक श्री. सुनील घनवट, तसेच समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी मार्गदर्शन केले.
मंदिर विश्वस्तांचे अभिप्राय१. बैठकीमध्ये वक्त्यांनी मांडलेले हिंदु धर्मावरील सर्व आघात हे वास्तव आहेत. ते थांबले पाहिजेत. |