ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे असणार !
नवी देहली – भारताच्या वर्ष २०२१ च्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत. प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी बोरिस जॉन्सन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमंत्रित केले होते, अशी माहिती ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब यांनी दिली आहे. यापूर्वी १९९३ मध्ये ब्रिटनचे पंतप्रधान जॉन मेजर या सोहळ्यासाठी आले होते. भारत प्रतिवर्षी विदेशातील प्रमुखांना आमंत्रित करत असतो.