आंध्रप्रदेशच्या सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेसच्या महिला नेत्याकडून टोल नाक्यावरील कर्मचार्यास मारहाण
सत्ताधार्यांची गुंडगिरी !
गुंटूर (आंध्रप्रदेश) – येथे सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाच्या नेत्या डी. रेवती यांनी काजा टोल नाक्यावरील टोल नाक्याच्या कर्मचार्याच्या थोबाडीत मारली. या कर्मचार्याने रेवती यांच्या गाडीला रोखून टोल मागितल्याने त्यांनी वाद घातला आणि नंतर ही मारहाण केली.