मराठा आंदोलनात शिरून भाजपचे लोक ‘ग्लोबल्स’ नीतीचा उपयोग करत आहेत ! – अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री
मुंबई, १५ डिसेंबर (वार्ता) – शासन इतर मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. हा राजकारणाचा विषय नाही. विधानसभेत दणका बसल्यावर विरोधकांना इतर मागासवर्गीय समाजाची आठवण झाली आहे. मराठा आणि इतर मागासवर्गीय समाज यांमध्ये वाद निर्माण केला जात आहे.
मराठा संघटनेतील काही लोक भाजपशी संबंधित आहेत. ते ‘ग्लोबल्स’ नीतीने काम करत आहेत, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केला. १५ डिसेंबर या दिवशी पुरवणी मागण्यांवर विरोधी पक्षाकडून मांडण्यात आलेल्या सूत्रांना उत्तर देतांना ते बोलत होते.