(म्हणे) ‘भगवान श्रीराम हे समाजवादी पक्षाचेही असून आम्हीसुद्धा रामभक्त आहोत !’ – समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव
|
अयोध्या (उत्तरप्रदेश) – भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्यावर कुणाचाही अधिकार नाही. भगवान श्रीराम हे समाजवादी पक्षाचेही आहेत. आम्ही रामभक्त आणि कृष्णभक्त आहोत. भगवान श्रीरामाची पूजा करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांसह लवकरच अयोध्येला जाणार आहे, असे वक्तव्य उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी येथे केले. ते सध्या राज्याच्या दौर्यावर आहेत. त्या वेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
Former Uttar Pradesh Chief Minister #AkhileshYadav said Lord Ram belongs to Samajwadi Party and he would soon visit #Ayodhya with his family members to worship the deityhttps://t.co/Ql5Zhh6yXV
— The Hindu (@the_hindu) December 15, 2020
अखिलेश यादव यांनी अयोध्येच्या विकासासाठी त्यांच्या सरकारच्या कार्यकाळात केलेल्या विविध कामांची सूचीही वाचून दाखवली.
(सौजन्य : Republic World)
‘अयोध्येतील विविध घाट, तसेच भजनस्थळे यांचा विकास समाजवादी पक्षाच्या सरकारच्या काळात करण्यात आला. अध्योतील जन्मभूमीस्थळ, परिक्रमेच्या संपूर्ण मार्ग यांठिकाणी पारिजातक, पपई आणि वड यासारख्या झाडांची लागवड करण्यात आली’, असे त्यांनी सांगितले.