कु. मयुरी डगवार यांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंनी कुशीत घेतल्यावर त्यांच्यातील विराट रूपातील देवीचे दर्शन होणे
‘एक दिवशी मी श्रीसत्शक्ति बिंदाताईंच्या खोलीत गेल्यावर त्यांनी मला कुशीत घेतले. तेव्हा मला त्यांच्यातील विराट रूपातील देवीचे दर्शन झाले.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई कमळात बसल्या असल्याचे दिसणे
श्रीसत्शक्ति बिंदाताई नंतर सोफ्यावर बसल्या. तेव्हा मला त्या ‘मोठ्या कमळात बसल्या आहेत’, असे दिसले. त्यांचे तेज पुष्कळ असल्यामुळे मी त्यांच्याकडे बघू शकले नाही. हे मी ताईंना सांगितले. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘मलाही सकाळपासून मोठे कमळ दिसत आहे.’’
३. सौरयागाच्या दिवशी उमटलेल्या चरणांचे दर्शन घेतांना स्थुलातून देवीतत्त्व प्रकट झाल्याचे जाणवणे
मी सौरयागाच्या दिवशी उमटलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांच्या ठशाचे दर्शन घेत होते. तेव्हा त्या ठिकाणी मला मोठे अष्टदल कमळ आणि मोठे ‘श्रीं’यंत्रही दिसले. त्या वेळी ‘सूर्याचे तेज आणि श्रीसत्शक्ति ताईंच्या अनाहतचक्रावर असलेली ‘श्रीं’यंत्राची शक्ती एकाच वेळी कार्यरत झाली आहे. त्यामुळे देवीतत्त्व स्थुलातून प्रकट झाले असावे’, असे मला जाणवले.
४. ‘अनेक दैवी चिन्हे आणि श्रीविष्णूचे चरण आश्रमात दिसतील’, असा विचार देवाने देणे
देवाने माझ्या मनात ‘यापुढे अनेक दैवी चिन्हे आणि साक्षात् श्रीविष्णूचे चरण परात्पर गुरुदेवांच्या खोलीत किंवा श्रीसत्शक्ति ताईंच्या खोलीत उमटलेली दिसतील’, असा विचार घातला.’
– कु. मयुरी डगवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.३.२०१९)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |