कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील प्राचीन मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी सापडलेले अर्धा किलो सोने सरकारजमा !
गावकर्यांची सोने परत घेण्यासाठी चळवळ
|
कांचीपूरम् (तमिळनाडू) – येथील उतीरामेरूरमध्ये असणार्या एका प्राचीन शिवमंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम करतांना गावकर्यांना मंदिराच्या गर्भगृहाच्या पायर्यांच्या खाली ५६५ ग्राम सोने सापडल्याची घटना घडली. सरकारी अधिकार्यांना याची माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी पोचले आणि त्यांनी यावर सरकारचा अधिकार असल्याचे सांगितले; मात्र गावकर्यांनी त्याला विरोध केला. ‘ही मंदिराची संपत्ती असून जीर्णोद्धारानंतर पुन्हा गर्भगृहातच त्याला ठेवण्यात येईल’, असे गावकर्यांनी सांगितले. या वेळी झटापटही झाली. त्यामुळे अधिकार्यांनी पोलिसांना बोलावले आणि बळाचा वापर करून सोने सरकारी तिजोरीत जमा केले. यामुळे आता संतप्त गावकर्यांनी सोने परत घेण्यासाठी चळवळ चालू केली आहे.
Villagers stumbled upon “ancient gold” during the renovation of a temple in Tamil Nadu and it was seized by authorities and deposited with the government treasuryhttps://t.co/7oEeVfyR1C
— WION (@WIONews) December 14, 2020
१. सरकारी अधिकार्यांच्या या कृतीमुळे लोकांमध्ये अप्रसन्नता आहे. ‘अशा घटना केवळ हिंदूंच्या धर्मस्थळांविषयीच केल्या जातात, अन्य धर्मियांविषयी सरकार अशी कृती करत नाहीत. मंदिराच्या पायर्यांच्या खाली सोने मिळणे हे शुभ मानले जाते. ही जुनी परंपरा आहे; मात्र सरकारी अधिकार्यांनी ही परंपरा मोडीत काढली’, असा आरोप गावकर्यांनी केला.
२. गावकर्यांनी सोने जप्त करण्याच्या विरोधात चळवळ चालू केली आहे. याविषयी महसूल अधिकारी असणार्या विद्या यांनी सांगितले की, सोने परत करायचे कि नाही, हे वरिष्ठ अधिकारी ठरवतील.
३. उतीरामेरूर भागामध्ये अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यामुळे याला मंदिरांचे शहरही म्हटले जाते. येथील मंदिरे चोल राजवंशाच्या काळात बांधण्यात आलेली आहेत.