मनमानी करणार्या पुण्यातील खासगी शाळांच्या विरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी पालकांचे आंदोलन !
प्रशासन स्वतःहून कृती का करत नाही ? पालकांना आंदोलन का करावे लागते ?
पुणे – शुल्क न भरणार्या विद्यार्थ्यांचे ‘ऑनलाईन’ शिक्षण बंद करणार्या शाळांविरोधात शिक्षण विभागाने कारवाई करावी यासाठी १० डिसेंबर या दिवशी सकाळपासून सायंकाळपर्यंत पालकांनी आंदोलन केले होते. त्या वेळी संबंधित शाळांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन शिक्षण विभागातील अधिकार्यांनी दिल्यानंतर पालकांनी आंदोलन मागे घेतले होते; परंतु प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने संतप्त पालकांनी शिक्षण संचालकांच्या कार्यालयासमोर ११ डिसेंबरला रात्री उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन चालू ठेवले होते. ‘कारवाई होत नाही, तोपर्यंत कार्यालयातच बसून रहाणार’, अशी भूमिका पालकांनी घेतली.
दरम्यान शिक्षण संचालक आणि संबंधित अधिकारी यांनी पालकांची भेट घेतली; पण शाळांवर कडक कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.