बनावट कागदपत्र बनवून भूमी बळकावल्याच्या प्रकरणी दोडामार्ग येथील दोघांना पोलीस कोठडी
सावंतवाडी – बनावट कागदपत्र सिद्ध करून भूमी बळकावल्याच्या प्रकरणी खानयाळे, दोडामार्ग येथील संजय गावडे आणि मोहन गवस या दोघांना येथील न्यायालयाने १६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी बजावली.
या प्रकरणी अनिल हेर्ले यांनी उपरोक्त दोघांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी गावडे आणि गवस यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला होता. त्यामुळे त्यांनी अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी अर्ज प्रविष्ट केला होता; मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात उपस्थित केले. खोटे कागदपत्र बनवलेल्या भूमीची किंमत ४ लाख रुपये असल्याचे म्हटले आहे.