३ मास शिधावाटप केंद्रातून (रेशन दुकानातून) धान्य विकत न घेतल्यास शिधापत्रिका रहित होणार !
केंद्र सरकारचा निर्णय !
नवी देहली – शिधावाटप केंद्रातून (रेशन दुकानातून) जर ३ मास धान्य घेतले नाही, तर शिधापत्रिका (रेशन कार्ड) रहित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
केंद्र सरकारचे म्हणणे आहे की, एखादी व्यक्ती ३ मास शिधावाटप केंद्रातून धान्य घेत नसेल, तर ती अन्य ठिकाणावरून शिधा घेण्यास सक्षम आहे. त्यामुळे अशांची शिधापत्रिका रहित करून त्यांना मिळणारा लाभ अन्य लोकांना देता येईल.