न्यायाधिशांच्या दिशेने चप्पल भिरकावणार्या धर्मांधाला २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
प्रशासकीय स्तरावर कोणत्याही यंत्रणेला न जुमानणार्या धर्मांधांची मानसिकता जाणा !
ठाणे – न्यायाधिशांच्या दिशेने चप्पल भिरकावून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अश्रफ वैदुजमा अंसारी या आरोपीला न्यायालयाने २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. या खटल्याचा निकाल ११ डिसेंबर या दिवशी ठाणे न्यायालयात लागला.
जानेवारी २०१९ मध्ये एका गुन्ह्याच्या सुनावणीसाठी अश्रफला भिवंडी येथील न्यायालयात आणले होते. त्या वेळी त्याने पायातील चप्पल न्यायाधिशांच्या दिशेने भिरकावली; परंतु न्यायाधीश प्रसंगावधान राखून बाजूला झाले. नंतर त्याने पुन्हा दुसरी चप्पल हातात घेऊन ती न्यायाधिशांच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न केला. तितक्यात पोलिसांनी त्याला पकडले; मात्र ही चप्पल एका महिला अधिवक्त्यांंना लागली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अश्रफविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. ६ साक्षीदार पडताळून आणि साक्षी, पुरावे ग्राह्य धरून न्यायाधीश पी.एम. गुप्ता यांनी आरोपीला वरील शिक्षा ठोठावली.