हिंदु नाव धारण करून धर्मांध तरुणाकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक शोषण
राजधानी देहलीतील प्रकरण
देहलीमधील कायदा आणि सुव्यवस्था केंद्राच्या अखत्यारीत आहे. देशाच्या राजधानीत ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे वाढत आहेत. हे लक्षात घेऊन आता केंद्र सरकारने येथेही लव्ह जिहादविरोधी कायदा अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !
देहली – देहली पोलिसांनी शोएब खान या १८ वर्षांच्या तरुणाला स्वतःची खरी ओळख लपवून हिंदू असल्याचे सांगून एका १५ वर्षांच्या अल्पवयीन हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढणे, तिला विवाहाचे आश्वासन देणे, तिचे अपहरण करून लैंगिक शोषण करणे आणि धर्मांतरासाठी दवाब निर्माण करणे या प्रकरणी अटक केली आहे. फेसबूकवरून त्याने या मुलीशी मैत्री केली होती.
18-yr-old boy, Shoyab Khan arrested & sent to judicial custody for befriending a 15-yr-old girl on Facebook by making an account under a false name, forcing her for marriage & kidnapping her. Girl found. Her father had filed complaint at Rajouri Garden Police Station:Delhi Police pic.twitter.com/t6KGe4r0Lx
— ANI (@ANI) December 12, 2020