मलेशियातील रोहिंग्यांची आतंकवादी संघटना भारतात आक्रमण करण्याच्या सिद्धतेत !
|
|
नवी देहली – रोहिंग्या मुसलमानांशी संबंधित एक आतंकवादी संघटना भारतामध्ये आक्रमण करण्याची सिद्धता करत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. एका महिलेच्या नेतृत्वाखाली ही आतंकवादी संघटना पुढील काही आठवड्यांमध्ये भारतातील शहरांमध्ये आक्रमण करू शकते. या संघटनेतील आतंकवाद्यांना म्यानमारमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे. आक्रमणासाठी आतंकवाद्यांचा समूह डिसेंबरच्या मध्यावर किंवा शेवटी बांगलादेशमार्गे भारतात येऊ शकतो, अशी माहिती गुप्तरचरांना मिळाली आहे. ही संघटना मलेशियामध्ये कार्यरत आहे. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित काही जिहादी या आतंकवादी समूहाला साहाय्य करू शकतात’, असा गुप्तचर यंत्रणांचा संशय आहे. देहली, हरियाणा, उत्तरप्रदेश, बिहार आणि बंगाल या राज्यांच्या पोलिसांना आणि गुप्तचर यंत्रणांना याची माहिती देण्यात आली आहे. अयोध्या, बोधगया, पंजाब आणि श्रीनगर या शहरांना या आक्रमणाचा अधिक धोका असल्याचे यात म्हटले आहे.
India busts Malaysia-based outfit’s terror attack plot https://t.co/lJWCUG7IXo pic.twitter.com/HSeJrTxfkA
— The Times Of India (@timesofindia) December 12, 2020
१. गुप्तचरांच्या माहितीनुसार या आक्रमणासाठी २ लाख डॉलर्सची (सुमारे १ कोटी ४७ लाख ४७ सहस्र रुपये) देवाणघेवाण झाली आहे. या व्यवहाराचा संबंध भारताशी आहे. तसेच याचे धागेदोरे जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असणारा आणि मलेशियात लपून बसलेला डॉ. झाकीर नाईक आणि या देशाची राजधानी कुआलालंपूरमध्ये असलेला रोहिंग्या नेता महंमद नसीर यांच्याशी आहेत.
२. आक्रमणाच्या योजनेतील महिला नेमकी कोण आहे, याविषयी माहिती मिळालेली नाही. या महिलेला याच वर्षी मलेशियाहून म्यानमारला प्रशिक्षणासाठी पाठवले गेले होते.