हिंदु धर्माचा जगभर प्रसार करणारे जय लखानी कालवश
लंडन (इंग्लंड) – हिंदु धर्माचा जगभर प्रसार करणारे जय लखानी (वय ७२ वर्षे) यांचे ५ डिसेंबर २०२० या दिवशी लंडन येथे देहावसान झाले. जय लखानी यांचा जन्म केनियाच्या मोम्बासा येथे वर्ष १९४८ मध्ये झाला होता. त्यांचे बालपण टांझानियाच्या दारेसलाममध्ये गेले. वर्ष १९६४ मध्ये वयाच्या १५ व्या वर्षी ते लंडनला आले आणि पुढील शिक्षण घेतले.
१. वर्ष १९७१ मध्ये ते वडिलांच्या व्यवसायात सहभागी झाले. वर्ष १९९४ मध्ये व्यवसायातून निवृत्ती घेतल्यापासून ते हिंदु अॅकॅडमीच्या माध्यमातून दूरदर्शन, रेडिओ आणि विविध लेख अन् प्रकाशने यांसह व्यापक माध्यमाद्वारे हिंदु धर्माचे प्रचारक म्हणून विनावेतन काम करत होते.
२. त्यांनी विविध विद्यापिठांमध्ये ‘विज्ञान आणि अध्यात्म’ या विषयावर भाषणे दिली. त्यांनी ‘शाळांसाठी हिंदु धर्म’ आणि ‘प्राथमिक हिंदु धर्माचा अभ्यास’ अशा दोन ग्रंथांचे संपादन अन् प्रकाशन केले होते.