रूपी बँकेच्या विलिनीकरणाचा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीत !
पुणे – रूपी बँकेचे प्रशासक गुंतवणूकदारांना विश्वासात न घेता परस्पर व्यवहार करीत असल्याचा आरोप ‘ग्रुप ऑफ पीपल वर्क’ या संघटनेने पत्रकार परिषदेत केला होता. त्यावर रूपी बँकेच्या विलिनीकरणाचा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीत आहे. विलिनीकरणासाठी कोणत्याही बँकेचा प्रस्ताव प्रशासकांकडे आलेला नाही. त्यामुळे प्रशासकांनी ते नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्टीकरण रूपी बँकेचे प्रशासक सुधीर पंडित यांनी सांगितले.