हत्येसाठी नेण्यात येणार्या गोवंशियांची पोलिसांनी केली सुटका; दोन धर्मांधांना अटक
गोवंश हत्याबंदी कायदा अस्तित्वात येऊनही गोवंशियांची अवैध वाहतूक होते, हे लज्जास्पद आहे ! कायद्याची कठोर कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे.
सोलापूर – ९ डिसेंबर या दिवशी हत्या करण्यासाठी अवैधपणे नेण्यात येणारे गोवंश पोलिसांनी कह्यात घेऊन इलियास नजीर शेख आणि मोहसीन कुरेशी यांना अटक केली आहे. हे धर्मांध गायीची ३६ वासरे आणि म्हशीचे १२ रेडकू एका चारचाकी वाहनामध्ये दाटीवाटीने कोंबून घेऊन जात होते.