स्वयंपाक बनवतांना पदार्थांमध्ये तिखटाचा उपयोग अत्यल्प प्रमाणात करा !

आहार आणि आचार यांसंबंधी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘पूर्वी गृहिणी सुगरण (सात्त्विक) असत. त्यांचे आचार-विचार सात्त्विक असून ते बनवत असलेला स्वयंपाक सात्त्विक आणि रूचकर लागत असे. आपल्या आजीने बनवलेल्या सात्त्विक स्वयंपाकाची चव आजही आपल्याला आठवते. सध्याच्या विज्ञानयुगात मानवाचे जीवन अत्यंत धकाधकीचे आणि तणावपूर्ण बनले आहे, तसेच वातावरणातील रज-तमाचे प्रमाणही पुष्कळ वाढले आहे. याचा परिणाम मानवाचा देह, मन आणि बुद्धी यांवर होतो. हल्ली बहुतेकांना घरी बनवलेल्या सात्त्विक आणि सपक (कमी तिखट) पदार्थांपेक्षा उपाहारगृहात किंवा पेठेत (बाजारात) मिळणारे मसालेदार अन् तिखट पदार्थ खायला पुष्कळ आवडतात, तसेच घरातही स्वयंपाक बनवतांना भाजी, आमटी, कोशिंबीर, चटणी इत्यादी पदार्थांमध्ये तिखटाचे प्रमाण अधिक असल्याचे सर्वत्र दिसून येते. ‘स्वयंपाक बनवतांना पदार्थामध्ये तिखटाचा उपयोग अधिक प्रमाणात केल्यास व्यक्तीवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

या चाचणीत तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली १ साधिका, तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली ६६ टक्के पातळीची १ साधिका, आध्यात्मिक त्रास नसलेला १ साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेली ६८ टक्के पातळीची १ साधिका असे एकूण ४ साधक सहभागी झाले होते. या चाचणीत एकूण ३ प्रयोग करण्यात आले. पहिल्या प्रयोगात साधकांना बटाट्याच्या काचर्‍यांची ‘तिखट भाजी’, दुसर्‍या प्रयोगात ‘मध्यम तिखट भाजी’ आणि तिसर्‍या प्रयोगात ‘तिखट न घालता बनवलेली भाजी’ खाण्यास दिली. (मध्यम तिखट भाजीच्या तुलनेत तिखट भाजीमध्ये लाल तिखटाचे प्रमाण दुप्पट होते.) तिन्ही प्रयोगांमध्ये साधकांनी (प्रत्येकी १ वाटी) भाजी खाण्यापूर्वी, तसेच खाल्ल्यानंतर २० मिनिटांनी त्यांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. या सर्व निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास केल्यावर तिन्ही प्रकारच्या भाज्या खाल्ल्याने साधकांवर झालेला परिणाम पुढे दिला आहे.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.


१ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्‍लेषण – तिखट भाजी खाल्ल्याने साधकांवर नकारात्मक परिणाम होणे, मध्यम तिखट भाजी खाल्ल्याने त्यांच्यावर थोडा सकारात्मक परिणाम होणे, तर तिखट न घालता बनवलेली भाजी खाल्ल्याने त्यांच्यावर सर्वाधिक सकारात्मक परिणाम होणे : हे पुढे दिलेल्या सारणीतून स्पष्ट होते.


या सारणीतून पुढील सूत्रे लक्षात आली.

१. तिखट भाजीमध्ये सर्वाधिक नकारात्मक ऊर्जा असून अत्यल्प सकारात्मक ऊर्जा आढळली. तिखट भाजीच्या तुलनेत मध्यम तिखट भाजीमध्ये अल्प प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असून थोडी अधिक सकारात्मक ऊर्जा आढळली.

२. तिखट न घालता बनवलेल्या भाजीमध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच नसून अन्य दोन्ही भाज्यांच्या तुलनेत अधिक सकारात्मक ऊर्जा आढळली.

३. साधकांनी तिखट भाजी खाल्ल्याने त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जेत वाढ होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा न्यून झाली.

४. साधकांनी मध्यम तिखट भाजी खाल्ल्याने त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा थोडी न्यून होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत थोडी वाढ झाली.

५. साधकांनी तिखट न घालता बनवलेली भाजी खाल्ल्याने त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा न्यून होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली.

सौ. मधुरा कर्वे

२. निष्कर्ष

तिखट भाजी खाल्ल्याने साधकांवर नकारात्मक परिणाम झाला, मध्यम तिखट भाजी खाल्ल्याने त्यांच्यावर थोडा सकारात्मक परिणाम झाला, तर तिखट न घालता बनवलेली भाजी खाल्ल्याने त्यांच्यावर सर्वाधिक सकारात्मक परिणाम झाला.

३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. चाचणीतील तिखट भाजी आणि मध्यम तिखट भाजी यांच्यामध्ये नकारात्मक स्पंदने आढळण्याचे कारण : चाचणीतील तिखट आणि मध्यम तिखट भाज्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली; पण तिखट न घालता बनवलेल्या भाजीमध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच नसून अन्य दोन्ही भाज्यांच्या तुलनेत अधिक सकारात्मक ऊर्जा आढळली. याचे कारण हे की, लाल तिखटात (मिरचीमध्ये) तमोगुण असतो. तिखटातून (मिरचीतून) उत्सर्जित होणार्‍या तमोगुणी स्पंदनांकडे वातावरणातील अनिष्ट शक्ती लगेच आकर्षित होतात. स्वयंपाक बनवतांना पदार्थांमध्ये तिखटाचा उपयोग अधिक प्रमाणात केल्यास त्या पदार्थांकडे अनिष्ट शक्ती आकृष्ट होत असल्याने ते पदार्थ नकारात्मक स्पंदनांनी भारीत होऊन पदार्थांतील सात्त्विकता न्यून होते. नकारात्मक स्पंदनांनी भारीत पदार्थ ग्रहण केल्याने व्यक्तीचे देह, मन आणि बुद्धी यांवर त्रासदायक स्पंदनांचे आवरण येते. त्यामुळे व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास होतात किंवा त्यांमध्ये वाढ होते. याचाच प्रत्यय चाचणीतून पुढीलप्रमाणे आला.

३ आ. तिखट भाजी खाल्ल्याने चाचणीतील साधकांवर नकारात्मक परिणाम होणे : चाचणीतील चारही साधकांमध्ये आरंभी नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा होती. तिखट भाजी खाल्ल्यानंतर त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जेत वाढ होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा न्यून झाली. (तिखट भाजी खाल्ल्याने त्यांना झालेले त्रास सूत्र ‘४’ मध्ये दिले आहेत.) यातून त्यांना तिखट भाजी खाल्ल्याने आध्यात्मिकदृष्ट्या हानी झाल्याचे लक्षात येते.

३ इ. मध्यम तिखट भाजी खाल्ल्याने चाचणीतील साधकांवर थोडा सकारात्मक परिणाम होणे : तिखट भाजीच्या तुलनेत मध्यम तिखट भाजीमध्ये नकारात्मक ऊर्जा अल्प असून सकारात्मक ऊर्जा थोडी अधिक आहे. साधकांनी मध्यम तिखट भाजी खाल्ल्याने त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा थोडी न्यून होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत थोडी वाढ झाली. यातून मध्यम तिखट भाजी खाल्ल्याने त्यांना अल्प प्रमाणात आध्यात्मिक लाभ झाल्याचे दिसून आले.

३ ई. तिखट न घालता बनवलेली भाजी खाल्ल्याने साधकांवर सर्वाधिक सकारात्मक परिणाम होणे : तिखट न घालता बनवलेल्या भाजीमध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच नसून अन्य दोन्ही भाज्यांच्या तुलनेत अधिक सकारात्मक ऊर्जा आहे. ही भाजी खाल्ल्याने साधकांना अन्नातून ऊर्जा मिळून त्यांच्याभोवती असलेले काळे आवरण न्यून झाले, तसेच त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली. यातून तिखट न घालता बनवलेली भाजी खाल्ल्याने त्यांना आध्यात्मिकदृष्ट्या लाभ झाल्याचे दिसून आले.

४. तिखट भाजी, मध्यम तिखट भाजी आणि तिखट न घालता बनवलेली भाजी खाल्ल्यावर चाचणीतील साधकांना जाणवलेली सूत्रे

थोडक्यात, ‘अन्नपदार्थांमध्ये तिखटाचा उपयोग अधिक प्रमाणात करणे आध्यात्मिकदृष्ट्या हानीकारक आहे’, हे या वैज्ञानिक चाचणीतून सिद्ध झाले. तिखट पदार्थ सतत खाल्ल्याने व्यक्तीच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. यामुळे स्वयंपाक बनवतांना पदार्थांमध्ये तिखटाचा उपयोग अत्यल्प प्रमाणात करणे आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे,’ हे लक्षात येते.

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (९.१२.२०२०)

ई-मेल : mav.research2014@gmail.com

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक