मुंबईतून १ कोटी ४० लाखांचे अमली पदार्थ कह्यात
मुंबई – मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कांदिवली येथून १ कोटी ४० लाख रुपयांचा अमली पदार्थ कह्यात घेतला आहे. या प्रकरणी दीनानाथ उपाख्य टुनटून रंगनाथ चौहान, मुस्तफा लाऊड आका, जेरमेन जेरी, सन्नी साहू यांना अटक करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेला मेफेड्रॉन (एम्डी) हा अमली पदार्थ विकण्यासाठी २ परदेशी नागरिक कांदिवली येथील खजुरीयानगर येथे येणार आहेत, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १ कोटी ४० लाख रुपये मूल्याची ७०० ग्रॅम एम्डी पावडर कह्यात घेण्यात आली. हे दोन्ही परदेशी नागरिक अमली पदार्थांचा व्यवसाय करण्यासाठी हिंदी शिकले आणि त्यांनी स्थानिक माहिती गोळा केली.