मलप्पूरम् (केरळ) येथील मंदिरात हिजाब परिधान केलेल्या महिलेकडून बूट घालून प्रवेश !
मंदिराच्या सचिवांकडून पोलिसांत तक्रार
|
मलप्पूरम् (केरळ) – मलप्पूरम् या मुसलमानबहुल जिल्ह्यातील वन्नियामबलम् मंदिरात बूट घालून प्रवेश केल्याच्या प्रकरणी हिजाब घातलेल्या एका महिलेच्या विरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. श्री त्रिपुरसुंदरीदेवी मंदिराचे सचिव सरथ कुमार यांनी ही तक्रार केली आहे. या महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही; मात्र तिचे छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहे. यात ती मंदिराच्या परिसरात बूट घालून बसल्याचे दिसत आहे.
Kerala: Complaint lodged against a Hijab clad girl for entering a temple in Malappuram district wearing shoeshttps://t.co/OwEAHtSKBY
— OpIndia.com (@OpIndia_com) December 12, 2020
(वरील छायाचित्रे प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. – संपादक)
सरथ कुमार यांनी केलेल्या तक्रारीत ‘या कृतीमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावण्यात आल्या आहेत. यातून धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे’, असे म्हटले आहे.