शिवकवच कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण !
सांगली – वखारभाग येथील शिवकवच कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने दीपावलीच्या निमित्ताने भव्य किल्ला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यातील विजेत्यांना नुकतेच भाजप आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाह श्री. नितीन चौगुले, ज्येष्ठ धारकरी श्री. सुनीलबापू लाड (नाना), शिवकवच कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रकाश निकम यांसह मंडळातील सदस्य, सांगलीतील धारकरी अन् स्पर्धक उपस्थित होते. सर्व विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी देण्यात आली, तसेच सहभागी सर्व स्पर्धकांचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.
स्पर्धेतील बक्षीसे पुढील प्रमाणे आहेत. खुला गट – प्रथम क्रमांक – राजमुद्रा ग्रुप, गवळी गल्ली – तोरणा किल्ला, द्वितीय क्रमांक – सांगलीवाडी येथील हिंद विजय चौक – सिंधुदुर्ग किल्ला, तृतीय क्रमांक खणभाग येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडळ – तोरणा किल्ला, गणेशनगर येथील आदर्श हुशारे – राजगड किल्ला, सांगलीवाडी येथील शिवभारत मंडळ – पारगड. विशेष गौरवमध्ये कवलापूर येथील स्वराज्य दौलत दुर्गनाद प्रतिष्ठान – सिहंगड भव्य प्रतिकृती, अभयनगर येथील शिवतीर्थ कला, क्रीडा मंडळ यांना सिंहगड प्रतिकृती आणि देखावा साकारल्याप्रकरणी बक्षीस देण्यात आले.
लहान गटात राम टेकडी येथील शिवसमर्थ कला क्रीडा मंडळ – तिकोणा किल्ला, विजय चौक येथील यश साखळकर- सिंहगड किल्ला, शिवोदयनगर येथील दर्शन बंडगर – सिंहगड किल्ला, विनायकनगर येथील संदीप सकट, रेवा बोळाज यांना – सुवर्ण दुर्ग साकारल्याप्रकरणी बक्षीस देण्यात आले. यांसह सोहम फल्ले, सार्थक देसाई, अभिषेक स्वामी, छत्रपती वाँरिअर्स, अनिरुद्ध जरंडीकर यांना काल्पनिक गटात बक्षीसे देण्यात आली.