वाळपई येथील १० वी चा विद्यार्थी आणि कुजिरा, बांबोळी येथील शिक्षिका कोरोनाबाधित
वाळपई, ११ डिसेंबर (वार्ता.) – कुडचडे येथील उच्च माध्यमिक विद्यालयातील १२ वी इयत्तेतील विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्याची घटना ताजी असतांनाच ११ डिसेंबर या दिवशी वाळपई येथील विद्यालयाचा १० वी इयत्तेतील एक विद्यार्थी आणि कुजिरा, बांबोळी येथील आणखी एक शिक्षिका कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे या सर्व विद्यालयांतील नियमित वर्ग रहित करण्यात आले आहेत. यापूर्वी कुजिरा, बांबोळी आणि उसगाव येथील विद्यालयांमधील प्रत्येकी एक शिक्षक कोरोनाबाधित आढळले होते. राज्यात १० आणि १२ वी इयत्तेचे नियमित वर्ग झाल्यानंतर शिक्षक अथवा विद्यार्थी कोरोनाबाधित होण्याच्या राज्यात एकूण ५ घटना घडल्या आहेत.