गोव्यात दिवसभरात १०४ नवीन कोरोनाबाधित
पणजी – गोव्यात सलग दुसरा दिवस कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झाला नाही. दिवसभरात १०४ नवीन कोरोनाबाधित आढळले, तर १३० रुग्ण बरे झाले. यामुळे सध्या प्रत्यक्ष उपचार घेणार्या रुग्णांची संख्या १ सहस्र १८७ झाली आहे. दिवसभरात कोरोनाशी संबंधित १ सहस्र ६४४ चाचण्या करण्यात आल्या.