सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !
१. नामजप करतांना श्री शांतादुर्गादेवीने कुटुंबियांची आध्यात्मिक उन्नती होण्याविषयी आश्वस्त करणे
‘८.८.२०२० या दिवशी आमची कुलदेवी श्री शांतादुर्गादेवीचा दिवस म्हणजे पंचमी होती. त्या दिवशी नामजप करतांना मला दिसले, ‘शांतादुर्गादेवी माझ्यासमोर उभी राहून मला सांगत आहे, ‘तुला मंदिरात येता येत नाही; म्हणून मी इथे आले आहे.’ मी तिला नमस्कार केला. तेव्हा देवी मला म्हणाली, ‘मुलांची काळजी करू नकोस. तुझी दोन्ही मुले संत होतील आणि त्यांची प्रगती होऊन ते सत्यलोकात जातील. तुझी सूनही जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होणार आहे. तुमची वास्तू ‘तीन संतांचे घर’ म्हणून ओळखली जाणार आहे.’ देवीने ही अनुभूती दिल्याविषयी मी तिच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
२. सूक्ष्मातील प.पू. गुरुदेवांनी ‘तुमची जागा माझ्या हृदयात आहे’, असे सांगणे
‘१२.८.२०२० या दिवशी मी सूक्ष्मातून प.पू. गुरुदेवांना विचारले, ‘मला या चार दिवसांत एकही अनुभूती आली नाही.’ तेव्हा प.पू. गुरुदेव मला म्हणाले, ‘मी यापूर्वी तुम्हाला सांगितले आहे, ‘तुमची जागा माझ्या हृदयात आहे. तुम्ही आता माझ्यात सामावून गेल्या आहात आणि आता तुमचे वेगळे अस्तित्व राहिले नाही.’ परम पूज्यांनी ही अनुभूती दिल्याविषयी मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– (सद्गुरु) श्रीमती प्रेमा कुवेलकर, कवळे, फोंडा, गोवा. (१२.८.२०२०)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |