शिर्डी येथे पदयात्रींनी पालख्या आणू नयेत ! – श्री साई संस्थानचे आवाहन
नगर – २५ डिसेंबर या दिवशी असणारी नाताळ सणाची सुट्टी, तसेच ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त शिर्डी येथे गर्दी होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येणार्या साईभक्तांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी ‘ऑनलाईन’ दर्शन पास घेऊनच शिर्डी येथे यावे, तसेच प्रतीवर्षी नियमित पालखी घेऊन येणार्या पदयात्रींनी यावर्षी पालखी आणू नये, असे आवाहन शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी ११ डिसेंबर या दिवशी केले.