आमदार अरुणअण्णा लाड यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ
कुंडल (जिल्हा सांगली) – पुणे पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार अरुण अण्णा लाड यांनी ८ डिसेंबर या दिवशी विधानभवनात विधान परिषद सदस्यत्वासमवेत गोपनियतेची शपथ घेतली. या प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांसह जिल्हा बँकेचे संचालक किरण लाड, उद्योजक उदय लाड, दिलीप लाड, जिल्हा परिषद गटनेते शरद लाड उपस्थित होते. क्रांंतीअग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड यांनी वर्ष १९६२ मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेत सदस्यत्वाची शपथ घेतली होती. त्यानंतर ५८ वर्षांनंतर त्यांचे पुत्र, क्रांती उद्योग समूहाचे नेते आमदार अरुणअण्णा लाड यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली.