प्रभाग क्रमांक १६ मधील रेवणी रस्त्यावरील फायर स्टेशनच्या जागेवरच नवीन अत्याधुनिक फायर स्टेशन बांधा !
भाजप नगरसेविका अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे यांचे आयुक्तांना निवेदन
सांगली, ११ डिसेंबर (वार्ता.) – सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे सांगली शहरातील गावठाण भागाकरिता असणारे फायर स्टेशन हे प्रभाग क्रमांक १६ मध्ये रेवणी रस्त्यावर आहे. हे फायर स्टेशन आयुक्तांच्या आदेशाने स्टेशन चौक येथे स्थानांतरित करण्यात आले आहे. या जागेवर प्रशासन काय करणार आहे ?, याची सदस्य म्हणून आम्हाला काही माहिती नाही. येथे आग, तसेच अन्य समस्या निर्माण झाल्या, तर अग्नीशमन गाड्या अल्प वेळेत आमच्या प्रभागात पोचण्यासाठी रेवणी रस्त्यावरच फायर स्टेशन असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक १६ मधील रेवणी रस्त्यावरील फायर स्टेशनच्या जागेवरच नवीन अत्याधुनिक फायर स्टेशन बांधण्यात यावे, या मागणीचे निवेदन भाजप नगरसेविका अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे यांनी आयुक्त नितीन कापडणीस यांना दिले. या वेळी अन्य महिला भाजप कार्यकर्त्या उपस्थित होत्या.