कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यावरील खटल्याची सुनावणी १६ डिसेंबरला
नगर – आरोग्य विभागाने कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (देशमुख) यांच्याविरुद्ध संगमनेरच्या कनिष्ठ न्यायालयात गुन्हा प्रविष्ट केला आहे. कनिष्ठ न्यायालयातील निकालाला सत्र न्यायालयात दाद मागतांना इंदुरीकर महाराज यांच्या वतीने सादर करण्यात आलेली कागदपत्रे अपूर्ण होती. ती पुराव्यांची संपूर्ण कागदपत्रे प्रमाणित करून घेऊन सत्र न्यायालयात सादर करावीत, असा आदेश न्यायालयाने त्यांच्या अधिवक्त्यांना दिल्यामुळे त्यांच्यासंबंधीच्या खटल्याची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली. आता ती १६ डिसेंबरला होणार आहे. त्यानंतर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद होणार आहे.