ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र न लावण्याचे धर्मांध ग्रामसेवकाचे कारस्थान शिवप्रेमींनी उधळले !
कुडाळ तालुक्यातील नारूर ग्रामपंचायत कार्यालयातील घटना
क्षमा मागण्यासह त्याच्याच हस्ते छत्रपतींचे छायाचित्र लावून घेतले
धर्मांधतेपोटी राष्ट्रपुरुषांनाही विरोध करणारे नगरसेवक ! महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा लावायची नाही, तर जिनांची लावायची का ?
कुडाळ – तालुक्यातील नारूर ग्रामपंचायतीच्या कर्मचार्यांना कार्यालयात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र लावायचे नाही आणि नवीन चित्र खरेदी करायचे नाही, असे ग्रामसेवक आदम शहा यांनी सांगितले. याविषयी माहिती मिळताच शिवप्रेमी आणि सकल मराठा समाज यांच्याकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या वेळी मराठा क्रांती मोर्च्याचे जिल्हा समन्वयक अधिवक्ता सुहास सावंत यांनी ९ डिसेंबरला नारूर ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देत धर्मांध ग्रामसेवकाला धारेवर धरले. ‘महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अनुद्गार काढलेले कदापीही सहन करणार नाही’, असे ठणकावत ग्रामसेवकाला क्षमा (माफी) मागायला लावली आणि त्याच्याच हस्ते नवीन शिवप्रतिमा कार्यालयात लावून घेतली. (धर्मांध नगरसेवकाला खडसावणार्यांचे अभिनंदन ! आज प्रतिमा लावण्यास विरोध करणारे उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करण्यास विरोध करतील ! – संपादक) ग्रामसेवकाने त्याची चूक मान्य करून समस्त शिवप्रेमी, सकल मराठा समाज यांची जाहीर क्षमा मागून ‘अशी चूक पुन्हा होणार नाही’, असे सांगितले. या वेळी मराठा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष दिनेश म्हाडगुत, बंड्या सावंत, दीपक नारकर, संध्या तेरसे, भाऊसाहेब महाडदेव, सूर्यकांत नाईक, शैलेश घोगळे, नंदकिशोर सरनोबत, आबा कुणेकरकर, नरेंद्र राणे, नारूरचे उपसरपंच प्रशांत बोडेकर आदी उपस्थित होते.