दाबोळी विमानतळ उड्डाणक्षेत्रातील अनधिकृत मदरशावर कारवाई करा ! – स्थानिकांची उपजिल्हाधिकार्यांकडे मागणी
अशी मागणी का करावी लागते ?
प्रशासनाच्या हे का लक्षात येत नाही ?
वास्को, १० डिसेंबर (वार्ता.) – दाबोळी विमानतळ उड्डाणक्षेत्रात बांधण्यात येत असलेल्या अनधिकृत मदरशावर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी तालुक्याचे उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. स्थानिक नागरिक अलेक्झांडर मायकल आदींनी हे निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, विमानतळ उड्डाणक्षेत्रात कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम करता येत नाही. असे केल्यास तो न्यायालयाच्या आदेशाचा अवमान ठरतो. अनधिकृत मदरसा त्वरित पाडावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.